खेलो इंडिया मध्ये सुवर्णपदक मिळवणारी हलगा गावची कन्या अक्षता कामती हिचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.रविवारी केलेल्या मन की बात मध्ये त्यांनी तिचे आणि तिच्या वडिलांचे देखील भरभरून कौतुक केलं आहे.
गेल्या 13 जानेवारी कु.अक्षता बसवंत कामती हिने खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवली असून सुवर्णपदक पटकावले होते. पुणे येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत 72 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती.
हलगा येथील एक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अक्षता हिने वेटलिफ्टिंग सारख्या खेळात राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणे कौतुकाची बाब आहे असे म्हणत मोदी यांनी तिचे वडील बसवन्त कामती यांचे देखील अभिनंदन केले आहे.खेळाडू मोठ्या शहरातुनच नव्हे बेळगाव सारख्या लहान लहान शहरातून येत आहेत हेच युवा निर्माण आहे असेही ते म्हणाले होते.
तुरमुरीची कन्या मलप्रभा जाधव हिने एशियन गेम्स मध्ये कांस्य पदक पटकावल्या नंतर बेळगाव तालुक्यातील मुली क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करताना दिसत आहेत. मलप्रभा नंतर पंतप्रधाना कडून कौतुक झालेली ही बेळगावची दुसरी कन्या आहे.सध्या ती साई स्पोर्ट्स इंडिया बंगळुरु येथे प्रशिक्षण करत असते तिला बंगळुरूचे प्रशिक्षक श्यामला शेट्टी,इरफान आणि बेळगावचे माजी प्रशिक्षक सदानंद मालशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.