स्मार्ट सिटीच्या संचालक पदी चारपैकी दोन मराठी नगरसेवकांची नियुक्ती महापौरांनी केल्यामुळे कन्नड माध्यमांनी महापौरांना लक्ष केलं आहे. महापौर बसाप्पा चिखलदिनी यांनी काल स्मार्ट सिटीच्या संचालक पदी नगरसेवक पंढरी परब,अनंत देशपांडे तर कन्नड नगरसेवक पुष्पा पर्वतराव,दिनेश नाशिपुडी यांची नियुक्ती केली होती.
महापौर बसाप्पा चिखलदिनी यांचं मराठी प्रेम उफाळून आले असून त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे अश्या शब्दात कानडी माध्यमांनी टीकास्त्र सोडले आहे.गेली चार वर्षे मराठी भाषिक महापौर होते याच वर्षी चिखलदिनी यांच्या रूपाने कन्नड भाषिकाला संधी मिळाली आहे मात्र त्यांनी एक प्रकारे मराठी नगरसेवकांना पाठीशी घालून कन्नड भाषिकांशी प्रथारना करण्याचे काम सुरू केलं आहे.
संचालक म्हणून नियुक्ती करण्यासाठी राज्य सरकारचे कोणतेही नियम नाहीत अश्यात 16 कन्नड भाषिक नगरसेवकांची संख्या असताना केवळ दोनच जणांना संधी देण्यात आली आहे असं करून त्यांनी कन्नड नगरसेवकांकडे एक प्रकारे दुर्लक्ष केले आहे.
महापौर स्वतः भाजपच्या तिकिटावर निवडून आलेत मात्र त्यांनी दोन समिती आणि दोघा काँग्रेस सदस्यांचीच नियुक्ती केलीय असा देखील आरोप कन्नड संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.परब आणि देशपांडे यांनी विकासाला खीळ घातली आहे अश्या नगरसेवकांना नियुक्ती शिफारस महापौरांनी केलीय.राज्य सरकारने थेट कन्नड भाषिकांची नियुक्ती करणे गरजेचे होते अशी प्रतिक्रिया नगरसेवक दीपक जमखंडी यांनी व्यक्त केली आहे.
वास्तविक पहाता नगरसेवक अनंत देशपांडे,पंढरी परब आणि दिनेश नाशिपुडी यांचा सभागृहातला अभ्यास पाहून निर्णय घेतला असताना कानडी संघटना आणि माध्यमातून त्यांना टार्गेट केले जात आहे.स्मार्ट सिटीचे संचालक पदी काम करणारी व्यक्ती अभ्यासू हवी केवळ दिखाऊ पणासाठी हे पद गरजेचे नाही.शेवटचे काही दिवसच अवधी उरला असताना स्मार्ट सिटीचे संचालक पदावरून पालिकेत कन्नड मराठी वाद सुरू झाला आहे त्यामुळे काही दिवसासाठी झालेल्या नियुक्त्या वादात अडकल्या आहेत.