मागील काही दिवसापासून तालुका पंचायतच्या जमाबंदीच्या चर्चा जोरात असताना ही बैठक निष्फळ झाल्याचे दिसून आले. काही तासाभरात कोणत्याही विषयावर चर्चा न करता ही बैठक संपविण्यात आली.
तालुका पंचायतीच्या सभागृहात ही बैठक घेण्यात आली. सकाळी १०.३० वाजता सुरू होणारी ही बैठक ११ नंतर सुरु झाली. यावेळी अध्यक्षस्थानी तालूका पंचायतीचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील होते.
यावेळी उपस्थित साऱ्यांनीच तालुका पंचायतीच्या मालमता बाबत माहिती विचारली. या प्रश्नाला बगल देत संबंधितांना नोटीसा पाठविण्यात येणार असल्याचे सांगून सभा गुंडाळण्यात आली. यामुळे या सभेचे महत्व राहिले नसल्याचे दिसून येत आहे.
या बैठकीला उपाध्यक्ष मारुती सनदी, फलोत्पादन खात्याचे जिल्हा कार्यकारी अधिकारी रवींद्र हकाटी, कार्यकारी अधिकारी पद्मजा पाटील, तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, रावजी पाटील, आपासाहेब कीर्तने, लक्ष्मी मेत्री, मनीषा पालेकर, नीना काकतकर आदी उपस्थित होते.