घटनास्थळा कोणताही ठोस पुरावा नसताना पोलीस निरीक्षक विजय सिननूर यांनी मारिहाळ डबल मर्डरचा छडा घटनेच्या केवळ 48 तासांच्या आत लावला आहे या प्रकरणी मारिहाळ पोलिसांनी मारिहाळ गांवच्याच तिघां युवकांना अटक केली आहे.
शिवानंद निंगप्पा करवीनकोप्प वय 23 ,महेश बसवराज नगारी वय 20,निंगप्पा बसवराज बललोळी वय 27 तिघेही मारिहाळ यांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शेतवाडीत खून झालेली घटना उघडकीस आली होती त्यात बसनगौडा सोमरेड्डी पाटील (वय 25) व पत्र्याप्पा मल्लाप्पा मल्लनावर (30, दोघेही रा. मारिहाळ) या दोघांचा तीक्ष्ण हत्त्याराने भोसकून खून करण्यात आला होता.आरोपीनी खून करून घटनास्थळा वरून मयतांचे मोबाईल देखील लांबवले होते त्यामुळे घटनास्थळी कोणताच पुरावा नव्हता तरी देखील मारिहाळ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केवळ दोनच दिवसाच्या आत लावला आहे.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तिन्ही आरोपींना मंगळवारी सकाळी सुळेभावी रेल्वे स्थानका जवळ अटक करून विचारणा केली असता जुने भांडण आर्थिक देवाण घेवाण आणि जमिनीच्या वादातून हे खून झाले असल्याचे उघड झाले आहे.मयत बसन गौडा आणि पत्र्यप्पा बरोबर त्यांचे जुने भांडण होते पैश्याच्या देवाण घेवाणीचा व्यवहार होता या शिवाय आरोपी निंगप्पा बललोळी यांच्या परसातील जागेसाठी मयतांची वाद होता त्यातूनच हा डबल मर्डर झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
आरोपींनी खून करण्यासाठी वापरलेली हत्यारे आणि मोबाईल जप्त केले आहेत.या खून प्रकरणाने मारिहाळ हादरले होते मात्र ए सी पी भालचंद्र, पोलीस निरीक्षक विजय सिननूर,सी सी बी आय चे संजीव कांबळे यांनी त्वरित हे खून प्रकरण सोडवल्याने पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.