चोरला मार्गावर दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी या दोन्ही घटना उघडकीस आल्या आहेत. एकीकडे गोव्याला ये जा करणारा अनमोड रास्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने परिणामी या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे त्यामुळे चोरला रस्ता डेंजर झोन बनू लागला आहे.
चोरला फाट्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत लक्ष्मी गणपती गवस वय 65 रा चोरला या जखमी झाल्या होत्या त्यांना तातडीने उपचारासाठी गोवा येथील साखळी इस्पितळात नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे.
दुसरी घटना याच मार्गावर घडली असून यामध्ये कणकुंबी येथील एक युवक जागीच ठार झाला आहे. दीपक पोटे वय 35 रा कणकुंबी असे त्याचे नाव आहे. पारवाड फाट्यावर हा अपघात झाला आहे. आमटेहून कणकुंबीकडे येत असताना हा अपघात घडला. ट्रकने ठोकरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे आहे.खानापूर पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.
अवजड वाहतूक बंद करा
चोरला मार्गावर एक ही मोठे इस्पितळ नाही
हॉस्पिटल नाही,रुग्णवाहिका नाही,साधे दवाखाने नाहीतअपघात झाल्यास जखमींना एक तर गोवा साखळी किंवा दुसरा बेळगाव हा पर्याय उपलब्ध आहे.गेल्या कित्येक दिवसात झालेल्या अपघातात जखमींचा उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाल्याच्या घटना वाढल्या आहेत.
सध्या स्थितीत वाढलेल्या वर्दळीमुळे या रस्त्यावरची वाहतूक धोक्याची बनली आहे इतकेच काय तर एक अपघात झाला की मोठ्या रांका लागतात अनेकदा ट्रॅफिक जाम होत असते सकाळी व संध्याकाळी गर्दी मोठी
वाहतुकीचे तीन तेरा झालेले असतात त्यामुळे अवजड वाहतूक बंद व्हायला पाहिजे अशी मागणी या भागातील लोक करत आहेत.