खानापूर शहराची आराध्य दैवत महा लक्ष्मी देवीची यात्रा केवळ एक महिना दोन दिवसाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असताना शहरात सगळी जय्यत तयारी सुरू आहे खानापूर नगरी सजवली जात असून यात्रा कमिटीने प्रवेश द्वार असलेल्या शिवस्मारकाची रंगरंगोटी केली आहे. शहरांतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणेसाठी नवीन पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत विविध रस्ते व गटार ची दुरुस्ती जुनी पाइपलाइन बदलनेचे काम प्रगती पथावर चालू आहे.
देवी जायच्या मार्गावर डांबर रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे गावातील प्रमुख मंदिरांना रंग रंगोटी करण्यात येत आहे शहरातील फूटपाथ वरील अतिक्रमणे हटवून फेरीवाल्या साठी स्वतंत्र बाजारपेठेची व्यवस्था करण्यात आली आहे.आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी यात्रा काळात शहरातील सोयीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला असून त्याद्वारे कामे केली जात आहेत.
असा असेल महा लक्ष्मी यात्रेचा कार्यक्रम
२० फेब्रुवारीला पहाटे अक्षता असतात .त्या नंतर गावातून मूर्ती फिरवून मग गदगेवर बसते सदर यात्रा ९दिवस चालणार आहे २० ते २८ फेब्रुवारी असा यात्रा काळ असेल यात्रा काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात येणार आहेत.
रणखांब्याचा विधी म्हणजे काय?
बुधवारी रात्री झाला रणखांब्याचा विधी आहे.
रणखांब्याचा विधी म्हणजे पूर्वी खानापूर शहरातील जे जुने तहसील ऑफिस आहे तिथे खानाचा वाडा होता आणि त्या खानाने पूर्वी आपल्या सैनिकांना मारून त्यांची प्रेत तिथं टाकली होती.ती प्रेत रात्रीच्या वेळेला जाऊन आपल्या लोकांनी उचलून आणली होती व वाटेत जो आडवा येईल त्याला मारत झोडत तोडत ती सर्व प्रेत खानापूर शहरातील गल्ल्यामधून नेऊन रणखांब म्हणून ठिकाण आहे तिथे नेऊन पुरली व त्यांचा अंत्यविधी केला होता अशी आख्यायिका जुने जाणते लोक सांगतात.म्हणून देवीच्या यात्रे अगोदर हा विधी केला जातो.