Wednesday, October 9, 2024

/

‘रिंग रोड विरोधात शेतकऱ्यांची निदर्शन’

 belgaum

प्रस्तावित रिंग रोड साठी महामार्ग  प्राधिकरण कडून बेळगाव तालुक्याच्या सभोवतालची तब्बल पंधराशे एकर हुन अधिक जमीन संपादन विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन केली  या शिवाय या जमीन संपादनास तीव्र विरोध दर्शवत सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने बेळगाव शहराच्या सभोवताली रिंगरोड करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. धामणे, कमकारहट्टी, कोंडुस्कोप, मुतगा, मुचंडी, कलखांब, काकती, कडोली, आंबेवाडी, गोजगा, बाची, उचगाव, बेळगुंदी, नावगे, वाघवडे, सुळगे येळ्ळूर, यरमाळसह 29 गावातील सुपीक जमीन रिंगरोडसाठी संपादित केली जाणार आहे याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.

Ring road protest

पिकाऊ जमीन भु संपादित करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, रिंगरोड रद्द करा आदी घोषणा देऊन जिल्ह्याधिकारी कार्यालयाचा परिसर यावेळी दणाणून सोडण्यात आला.राष्ट्रपती,पंतप्रधान,केंद्रीय परिवाहन मंत्री आदींना निवेदनाच्या प्रति पाठवण्यात आल्या आहेत.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, अरविंद पाटील, प्रकाश मरगाळे, एपीएमसी सदस्य आर के पाटील, तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, सुनील अष्टेकर, बी. डी. मोहनगेकर, कल्लाप्पा घाटेगस्ती, राजू मरवे, अॅड शाम पाटील, अॅड सुधीर चव्हाण उपस्थित होते.

आगामी पंधरा दिवसाच्या आत भू संपादन आदेश रद्द करा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देखील निवेदना द्वारे देण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.