बेळगाव मनपा वॉर्ड पुनर्रचना, आरक्षण विरोधात नगरसेवक धनराज गवळी आदी वकिलांनी घातलेली याचिकेवर मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात सुनावणी झाली खरी मात्र सरकारच्या वतीने या याचिकेवर अध्याप हरकत दाखल केली नसल्याने सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे बेळगाव महा पालिका निवडणूक आगामी लोकसभा निवडणुकी नंतर होतील अशी चिन्हे दिसत आहेत.
बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक कोणत्याही परिस्थितीत घेतली जाऊ नये. मनपाने आव्हान देऊन योग्य बाजू मांडावी तोपर्यंत ही प्रक्रिया स्थगित ठेवावी असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाचे न्यायमूर्ती आर देवदास 19 डिसेंम्बर रोजी दिला होता त्यानंतर काही दिवस कोर्टाला सुट्टी होती सुनावणीच्या चार तारखा देखील निघून गेल्या होत्या त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीत सरकार कडून हरकत दाखल केली गेली नाही.राज्य सरकार कडून हरकत दाखल करण्यास विलंब होत असल्याने महा पालिका निवडणुका आगामी सप्टेंबर मध्ये होतील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
वकील धनराज गवळी यांनी बेळगाव live ला दिलेल्या माहितीत सांगितले की मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने बेळगाव धारवाड आणि बेळळारी व्यतिरिक्त इतर पालिकांना मतदार यादी प्रसिद्ध करा अशी सूचना कोर्टाने दिली.राज्य सरकारला सध्या निवडणूक घ्यायची इच्छा नसल्याने म्हणणं मांडायला उशीर होत आहे बहुतेक सरकार सामान्य निवडणुकांची वाट बघत असेल बहुतेक ही निवडणूक लोकसभे नंतर होईल असे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी नरेंद्र सुनावणी दरम्यान म्हटले आहे. पुढील सुनावणीची तारीख कळेल असेही ते म्हणाले.