त्रिसदस्यीय खंडपीठातील न्यायाधीश नझीर अहमद,न्या.सिक्री आणि न्या.शाह या पैकी न्या.नाझिर अहमद यांनी सीमा प्रश्नाचा खटला चालवण्यास असमर्थता दर्शवल्याने दिल्ली सुप्रीम कोर्टासमोरील मंगळवारी होणारी सुनावणी पुढे ढकलली.
न्या.नजीर अहमद हे मूळचे कर्नाटक स्थित असल्यानें त्यांनी हा खटला या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर नको अश्या स्वरूपाची मांडणी झाल्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नी सुनावणी होऊ शकली आहे.
महाराष्ट्राच्या बाजूने वकील शिवाजीराव जाधव तर कर्नाटकच्या बाजूने वकील एन रघुपती यावेळी उपस्थिती दर्शवली होती.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी देखील कोर्टात हजेरी लावली होती. या खटल्याची सुनावणी वारंवार पुढे जात असल्याने सीमा भागातील मराठी भाषिकात नाराजीचा सूर आहे.नवीन त्रिसदस्यीय खंडपीठाची रचना झाल्यावर या खटल्याची सुनावणी होऊ शकणार आहे.