Tuesday, December 3, 2024

/

हायपर हायड्रोसिस-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum
घाम येणे ही एक साधीशी शारीरिक क्रिया आहे. परंतु अति घाम येणे हा एक विकार आहे. खरे तर शरीराचे वाढलेले तापमान कमी करण्यासाठी घाम सुटतो. व शरीर थंडावते. व्यायाम झाल्यावर भिती वाटल्यावर राग आल्यावर घाम येतो पण काही व्यक्तींना मात्र अति प्रमाणात घाम येतो. विशेषतः हाताच्या व पायाच्या तळव्यांना अक्षरशः पाणी सुटते. त्यामुळे शारीरिक त्रास तर होतोच होतो पण मानसिक त्रासही खूप होतो.
प्रकार 1
जनरलाईज्ड- म्हणजेच पूर्ण अंगाला येणारा अति प्रमाणातील घाम
2. लोकलाईज्ड- म्हणजेच फक्त विशिष्ट भागाला येणारा अति प्रमाणातील घाम
3. प्रायमरी- काही व्यक्तींना जन्मतःच जास्त घाम येत असतो.
4. सेकंन्डरी- काही विशिष्ट थायरॉईड ,पीट्युटरी, गाऊट,मेनोपॉज, काही औषधे इत्यादी गोष्टी आजारामुळे अतिरिक्त घाम येण्याचा प्रकार सुरू होतो.
कारणे-
अति घाम येण्याच्या प्रकारामध्येच त्याच्या कारणाचाही अंतर्भाव आहे परंतु असे मानले जाते की काही चेतना रज्जूच्या जातीच्या स्टीम्युलेशन (उद्युक्त) झाल्यामुळे अतिरिक्त घाम येवू शकतो. सतत भिती वाटणे राग येणे अशा क्रियांमुळे असे होवू शकते. इतरही काही आजार व औषधे कारणीभूत ठरू शकतात. अनेक सिंड्रोम (पी.एम.एस सिंड्रोम, बर्निंग फिट सिंड्रोम इ.) डायबेटीक न्युरोपथी,नागीण ,अंतस्रावी ग्रंथी (थायरॉईड अ‍ॅड्रिनल) विकार औषधे (इन्सुलिन पेनक्युलर्स निराशाप्रतिबंधक) उत्साहवर्धक औषधे इ. कारणास्तव अति प्रमाणात घाम येवू शकतो.
होमिओपॅथीमध्ये कॅल्केरिया कार्ब सल्फर लायकोडीयम इग्नेशिया यासारखी महत्वाची औषधे या विकारावर उपयुक्त असतात. परंतु प्रत्येक लेखात सांगितल्याप्रमाणे वैद्यकिय सल्ल्यानेच उपचार घेतल्यास रोग व्यवस्थित बरा होतो.
 belgaum

1 COMMENT

  1. हाताला घाम फार येतो.
    आयु

    र्वेदिक उपचार सांगितला तर बरं होईल.वय 22 वर्ष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.