भरपूर मोठ्या प्रमाणात पडलेल्या धुक्याने आज पहाटे बेळगाव शहराची बत्ती गुल केली. यामुळे बेळगाव वासींना तसेच आजूबाजूच्या काही ग्रामीण परिसरात सकाळी उठल्यावर वीज नसल्याचा फटका सहन करावा लागला.
आज पहाटे 5.20 मिनिटांनी 220 केव्ही चे विजकेंद्र बंद पडले. ते सुरू करण्याचे काम सुरू करून अंकलगी येथून 110 केव्ही वीज मागवून घेण्यात आली. त्यामुळे वीज परत आली तरी काही भागात वीज अजून आलेली नाही.
सकाळी सर्व व्यवहार विजेवर अवलंबून असतात त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. दुरुस्ती काम पूर्ण झाल्यावर पुन्हा ट्रिप झाल्याने आता परत दुरुस्ती सुरू असल्याची माहिती हेस्कॉमने दिली.