बेळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकासोबत शहराच्या सीटीबस सेवेसाठी वापरल्या जात असलेल्या सीबीटी बसस्थानकाचे देखील आधुनिकीकरण होणार आहे. या बस स्थानकाचा देखील कायापालट केला जाणार आहे.
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत 33 कोटींचे अनुदान सीबीटी साठी राखीव करण्यात येणार असून यात पार्किंग आणि बहुमजली इमारत सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.अशी माहिती मिळाली आहे.
मध्यवर्ती बसस्टँडचे आधुनिकीकरण सुरू असताना शहराच्या बस स्टँडकडे दुर्लक्ष झाले होते .या ठिकाणी अनेक गैरसोयी आहेत. खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे सुविधे अभावी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याचा विकास स्मार्ट सिटी योजनेतून केला जाणार आहे.
स्मार्ट सीटी कन्सल्टंट कंपनी कडून आराखडा तयार करण्यात आला आहे एकूण दोन एकर दहा गुंठे जागेत 32 बस थांबे, बहुमजली पार्किंगतळ, दुचाकी व चारचाकी पार्किंग तसेच पहिल्या मजल्यावर व्यापारीगाळे,विविध कार्यालये, शो रूम बनवले जाणार आहेत.या सर्वांसाठी निविदा मागवण्यात आली असून प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती स्मार्ट सिटी अभियंत्यांनी दिली आहे.
सध्या मूळ बांधकाम पाडवा पाडवीचे काम सुरू आहे. अनावश्यक भाग पाडवून जागा मोकळी करून घेण्यात येत आहे. यामुळे सध्या रोज जेथे बसची वर्दळ दिसत होती त्या ठिकाणी सगळे भकास दिसत आहे पण काही दिवसात या ठिकाणी चांगले बस स्थानक उभे राहिल अशी अपेक्षा आहे.