प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे शहर वासीयांना पे अँड युज म्हणजेच पैसे भरा आणि वापरा या प्रकारच्या नव्या स्वच्छतागृहाची भेट देण्यात आली.
फोर्ट रोड कॉर्नर वर देशपांडे पेट्रोल पंप जवळ नगरसेवक रमेश कळसन्नवर आणि मेलगे यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. याठिकाणी जुने आणि कधीच वापरले जात नसलेले स्वच्छतागृह होते. त्याची देखभाल घेतली जात नव्हती.
स्थानिकांची मागणी आणि बेळगाव महानगरपालिकेच्या सहकार्यातून रोटरीने नवीन स्वच्छतागृह बांधले. यामध्ये चार मुतारी कक्ष आणि एक संडास कक्ष बांधण्यात आला आहे. यासाठी 4.70 लाख इतका खर्च आला आहे.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव चे माजी अध्यक्ष सचिन बिच्चू आणि सेक्रेटरी अमित साठे यांनी 2017-18 मध्ये जमा केलेल्या निधीतून ही उभारणी झाली आहे. मुकुंद बंग, नितीन गुजर यांनी विशेष लक्ष घालून परिश्रम घेतले.
उदघाटन कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ मुकुंद उडचनकर, प्रदीप कुलकर्णी, बसवराज विभूती, प्रमोद अगरवाल, नितीन गुजर,कर्नल प्रकाश मिठारे, भूषण हेगडे, चारुदत्त नलगे, आनंद गुडस,सुरेश शेट्टी,रवी मोदी, नदीम बसपुरी हे उपस्थित होते.
Good Job Vijay ,Proud of u & ur friend.