यंदाच्या प्रजासत्ताक दिनी बेळगावचा सुपुत्र राष्ट्रपतींना सलामी देणार आहे.बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील दद्दी जवळील खवणेवाडीचा युवकाचा महामहनीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सलामी देणाऱ्या पथकात समावेश झाला आहे.
सुशांत सदाशिव पाटील असे दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेड मध्ये निवड झाल्याचे नाव असून ते नुकताच भारतीय नौदलात सब कमांडर म्हणून नियुक्त झाले आहेत.एका सामान्य कुटुंबातील सुशांत याने मेहनत जिद्द आणि हुशारीच्या जोरावर भारतीय नौदलात(indian navy) सब कमांडर म्हणून भर्ती झाले आहेत.
शनिवारी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनात ते सहभागी होणार आहेत.सुशांत यांचे वडील सदाशिव पाटील हे मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत सुशांतच्या या निवडीचे बेळगाव सह सीमा भागात कौतुक होत आहे.सब कमांडर सुशांत याला पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा!