टी सी मधून शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत सहा एकर जमिनीतील ऊस जळून खाक झाला आहे.
शेतात असलेल्या टी सी मुळे आणि हाय टेन्शन वायर मुळे झालेल्या शॉर्टसर्किट मुळे सहा एकर जमिनीतील ऊस आगीत जळून खाक झाला आहे.सांबरा शेतवडीत शुक्रवारी ही घटना घडली असून विविध शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
सदर जळलेल्या शेताचा पंचनामा तलाठी यांनी केला असून हेस्कॉम,पोलीस खात्याने देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.श्रीकांत सुभानजी, मारुती कळगौडा पाटील,बसवराज बाबू देसाई,भैरू बसप्पा पाटील,गजानन जाधव,निंगप्पा आपराय, बाळू देसाई आदींचे नुकसान झाले आहे.