बेळगाव शहर दक्षिण मतदार संघातील शहापूर तसेच रयत गल्ली वडगाव मधील शेतकऱ्यांची शेती शहापूर शिवारात 800 ते 850 एकर असल्याने शेतकरी आपल्या बैलगाड्या चारा तसेच शेतकरी महिला आपल्या शेताकडे गाडेमार्ग ,शहापूर ,बसवेश्वर सर्कल खासबाग ,भारत नगर ते बाजार गल्ली वडगाव आणि म विष्णू गल्ली वडगाव रस्तामार्गे रोज ये-जा करत असतात यावेळी मनपाने येथील अडचणी जाणून रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. पण आता त्याच रस्त्यावर भाजी फळे फुले तसेच इतर साहित्य विक्रेते दुकानदार यांनी अतिक्रमण केले आहे.
बैलगाड्या तर सोडाच दुचाकी जाणेही मुश्कील झाले आहे काही फळ भाजी विक्रेत्यांनी अर्धा रस्ताच काबीज केल्यामुळे बैलगाड्या जाणे अत्यंत अडचणीचे होत आहे.
सकाळ संध्याकाळी बैलगाडी जात येत असताना जर भाजी विक्रेत्यांच्या भाजीला बैलांचा पाय लागला तर ते आपल्याच मालकीची जागा असल्याचा आव आणतात .आणि दुसऱ्या रस्त्याने गाडी घेऊन जा असे सांगतात. याची दखल घ्यावी आणि बाजार गल्लीतील अतिक्रमण हटवावे अशी मागणी शेतकरी कमिटीने केली आहे याबद्दलचे निवेदन महापौरांना देण्यात आले आहे.