खानापूर तालुक्यातील तोपीनकट्टी गावची महालक्ष्मी यात्रा 3 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे या यात्रेस शासनाने सर्व सुविधा पुरवाव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ बी एस बोमनहळळी यांच्याकडे करण्यात आली आहे.
गुरुवारी तोपीनकट्टी येथील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन वरील मागणी केली आहे.
दर 12 वर्षातून या वर्षी ही यात्रा होत असून गावात रस्ते गटारी आणि पिण्याचे पाण्याची व्यवस्था करा जसें खानापूर शहराला लक्ष्मी यात्रेकरिता विशेष निधी उपलब्ध केला आहे त्याच धर्तीवर तोपीनकट्टी यात्रेस देखील निधी उपलब्ध करून करा असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर आदी उपस्थित होते.खानापूर आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी या लक्ष देऊन खानापूर शहराप्रमाणे ग्रामीण भागातील तोपीनकट्टी गावाला सुविधा उपलब्ध द्याव्यात अशी मागणी देखील केली जात आहे.
Very good setvice