बेळगाव विमानतळावरील जुन्या टर्मिनल बिल्डिंगचा वापर करून लवकरच बेळगावला विमान तळावरून एअर कार्गो विमान सेवा सूर करण्यात येणार आहे .केंद्रीय कौशल्य विकास राज्य मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
या कार्गो विमान सेवे साठी लागणारी सुविधा बेळगाव विमान तळावर तयार करण्यात येणार आहे. भारतीय एअर पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया कार्गो लॉजिस्टिक्स आणि सर्व्हिसेस ही कंपनी विमान तळ प्राधिकरणाची उप कंपनी आहे त्यांच्या कडून एक्स रे आणि स्क्रीनिंग बसवण्यात येणार आहे.
गुरुवारी १७ जानेवारी रोजी एअर कार्गो लॉजिस्टिस कंपनीचे अधिकारी बेळगाव विमान तळाला भेट देणार असून याबाबत माल वाहतूक दारांशी इतरांशी चर्चा करणार आहेत. बेळगावातून एअर कार्गो सुरु करा या सिटीझन कौन्सिलच्या जुन्या मागणीला यश आले आहे . सप्टेंबर २०१७ मध्ये सिटीजन कौन्सिलने बेळगावातून एअर कार्गो विमान सेवा सुरु करा अशी मागणी केली होती बेळगाव परिसरातील शेती माल फुल आणि हिरव्या भाजीपाल्याला जगप्रसिद्ध बनवून योग्य भाव मिळवून देण्यासाठी एअर कार्गो सुरू करण्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी सिटीजन कौन्सिलच्या वतीने करण्यात आली होती .
सिटीझन कौन्सिलची जुनी बातमी वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा