Friday, July 19, 2024

/

इस्कॉनची जगन्नाथ रथयात्रा 2 व 3 फेब्रुवारीला

 belgaum

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित करण्यात आलेली 21वी भगवान श्री जगन्नाथ रथयात्रा येत्या 2 व 3 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहाने साजरी होणार आहे .

इस्कॉन बेळगाव चे अध्यक्ष परमपूज्य श्री भक्ती रसमृतस्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जगन्नाथ रथयात्रा सेवा समितीची’ स्थापना करण्यात आली असून यामध्ये बेळगावच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे .दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रा भव्य प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय महाराज्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत घेण्यात आला .

याही वर्षी देशाच्या विविध भागातून भक्तगण या यात्रेत सहभागी होणार असून देश-विदेशातील काही जेष्ठ संन्याशीही येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. केवळ रथयात्रेपुरताच नागरिकांचा सहभाग मर्यादित न ठेवता श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरातील वर्षभरातील उपक्रमांमध्ये अधिकाधिक भक्तांना सहभागी करून घेण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. रथयात्रेच्या निमित्ताने स्थापन केलेली समिती उत्साहाने कार्यास लागली असून येत्या बुधवारी नऊ जानेवारीला मंडपाची मुहूर्तमेढ केली जाणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.