अधिवेशन काळात मंत्री, आमदार आणि थेट मुख्यमंत्र्यांची ये जा वाढल्याने बेळगाव शहरास वेठीला धरल्यासारखा कारभार सुरू आहे. सरकारी वाहने वाढली असल्याने आता शहरातील मुख्य वाहतुकीस खीळ बसली असून अधिवेशन जसे शहरा बाहेर घेता तशीच अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या राहण्याची सोय सुद्धा शहराबाहेरच करा अशी मागणी आहे.
बेळगाव शहरावर ताण पडू नव्हे म्हणूनच सुवर्ण विधानसौधची उभारणी हलगा येथे शहराबाहेर झाली. अधिवेशन काळात वास्तव्य करण्यासाठी या लोकांना सुवर्ण विधानसौध शेजारीच निवासी इमारत उभारण्याची चर्चा होती पण ती प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही आणि आता निवास व्यवस्था थेट शहरातच करावी लागत असल्याने अधिवेशन काळात बेळगाव शहराला वेठीला धरले जात आहे.
मुख्यमंत्री आणि काही महत्वाच्या व्यक्तींचे वास्तव व्हिटीयु विद्यापीठाच्या गेस्ट हाऊस मध्ये आहे तर बाकीचे अधिकारीही शहराच्या लॉजिंग मधून राहत आहेत. सभाध्यक्ष व इतर काही मंत्र्यांची सोय युके २७ या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. यामुळे त्यांची ये जा होत असताना सतत रहदारी रोखून धरण्यात येते. यामुळे स्थानिक नागरिकांना याचा फटका बसत आहे.
पुढील वर्षीपासून ही निवास व्यवस्था शहराच्या बाहेर करण्यात आली तर बरे होईल अशी चर्चा नागरिक करत आहेत. अधिवेशन सुरू झाले अनेक पोलीस गाड्या शहरात फिरताहेत शहरात फिरणाऱ्या लाल बत्ती व्ही आय पी मूव्हमेंट मुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम होत असते .