आगामी चोवीस तासात काँग्रेस जनता दल संमिश्र सरकार पडेल असे भाकीत माजी मंत्री हुक्केरी आमदार उमेश कत्ती यांनी केले आहे.बेळगावात चिकोडी आणि बेळगावं लोकसभा मतदार संघाची बैठक होणार आहे त्यात सहभागी होण्यासाठी बेळगावला आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
संमिश्र सरकार मध्ये काहीच अलबेल नाही आहे त्यामुळे आगामी चोवीस तासात हे सरकार पडेल असा दावा कती यांनी केला आहे.
काँग्रेसचे नाराज रमेश जारकीहोळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह याना भेटले असतील तर यात चुकीचे काय आहे जर ते भाजपात येत असतील तर त्यांचं स्वागत आहे असे म्हणत त्यांनी भाजप प्रवेशा साठी जारकीहोळी यांना दरवाजे पुन्हा एकदा खुले केले आहेत.
प्रदेशाध्यक्ष बी एस येडीयुरप्पा यांनी रमेश जारकीहोळी यांच्या सोबत गुप्त बैठक केली नाही आगामी एका आठवड्यात भाजपचे सरकार अस्तित्वात येईल असा देखील दावा उमेश कत्ती यांनी केला आहे.काँग्रेस जे डी एस चे नाराज 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत असा नवीन बॉम्ब देखील त्यांनी फेकला असून यामुळं पून्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
येडीयुरप्पा बेळगावात
चिकोडी आणि बेळगावं लोकसभा मतदार संघातील भाजप नेत्यांच्या बैठकीसाठी बी एस येडीयुरप्पा बेळगावात आले आहेत.रेल्वे उड्डाण पूल उदघाटन दरम्यान कोरे अंगडी वादाची देखील या बैठकीत चर्चा होणार असून लोकसभेच्या संभाव्य उमेदवार आणि पक्ष संघटने निवडणुकी बद्दल या बैठकीत चर्चा होणार आहे.हुबळीहून बेळगावं कडे येत असतेवेळी गुप्त स्थळी भेट झालो असल्याची देखील माहिती मिळत आहे.