जोवर रस्त्याचे काम सुरू होत नाही तोवर माघार नाही असे ठणकावत जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील आणि कंग्राळी खुर्द येथील महिला रस्त्यावर ठाण मांडूनच आहेत.एक तास रस्ता अडवल्या नंतर मार्केट यार्ड मध्ये जाणाऱ्या वाहनांची मोठी रांग लागली होती ए सी पी भरमनी यांनी हस्तक्षेप करत केवळ ट्रॅफिक सुरू केली असून कंग्राळी खुर्द गावच्या महिलांनी ठिय्या चालूच ठेवला आहे.
जोवर काम सुरू होत नाही तोवर आम्ही इथून हलणार नाही असा इशारा कंग्राळी खुर्द ग्रामस्थांनी दिला आहे.
शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजता शेकडो युवक महिलांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केलं एका तासात दोन्ही बाजूनी मार्केट यार्डात रताळी आणि इतर माल घेऊन जाणारी वाहने अडल्याने या भागात जाम झाला होता. ए सी पी मार्केट एन व्ही भरमनी यांनी आंदोलकांना बाजूला सरकवत रहदारी सुरू केली मात्र अध्याप महिला ठिय्या मांडून आहेत.