नवं वर्षाचे स्वागत साठी ओल्ड मॅन जाळून केलं जातं,31 डिसेंबर च्या रात्री 12 वाजता जाळण्यासाठी ओल्ड प्रतिकृती बनवण्याचे विक्रीचे काम बेळगावातील कॅम्प जोरात सुरू आहे. तेलगू कॉलनी जवळील प्रेम पुजारी त्यांचे भाऊ आणि आणखी एक असे तीन ठिकाणी ओल्ड मॅन ची प्रतिकृती बनवण्याचे काम जोरात सुरू आहे.
नववर्षाच्या स्वागताची तयारी बेळगावमध्ये सुरु झाली असून बेळगाव शाहरातल्या कॅम्प भागात ओल्डमनवर शेवटचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे.दरवर्षी ३१ डिसेम्बरला ओल्डमन दहन करण्याची परंपरा आहे . ओल्डमन कोणाचा अधिक उंच हा देखील ईर्षेचा विषय कॅम्प या विभागात ठरतो . तयार ओल्डमन कॅम्प मध्ये विकण्यासाठी उपलब्ध आहेत .
प्रेम पुजारी यान अणि याच्या परिवारांन वेगवेगळ्या आकाराचे ओल्डमन तयार केले आहेत . दिडशे रुपये सुरू होऊन अडीच हजार रु . इतका ओल्डमनचा दर आहे त्याच्या उंचीवर दर ठरतो बेळगाव शहरतील इतर भागात इथुनच ओल्ड मन खरेदी केले जातात.
कॅम्प मध्ये उत्साहात होते नवीन वर्षाचे स्वागत
कॅम्प भागात अनेक उंचच्या उंच ओल्ड मॅन प्रतिकृती जाळल्या जातात यावर्षी उद्या 31 रोजी रात्री 12 वाजता जाळण्यात येणाऱ्या ओल्ड मॅन प्रतिकृती उंच बनवल्या गेल्या आहेत. गवळी गल्ली,सेंट अंथोनी चर्च पोलीस क्वाटर्स मध्ये 15 ते 18 फूट उंचीचा ओल्ड मॅन बनवण्यात आला आहे.