Monday, June 17, 2024

/

‘मच्छे रोडच्या कामाला मिळाला मुहूर्त’

 belgaum

अधिवेशन आले घरा तोची दिवाळी दसरा या म्हणी प्रमाणे मंत्री महनीय व्ही व्ही आय पी व्हिजिट आणि विधान सभेच्या अधिवेशनाच्या पाश्वभूमीवरच बेळगाव शहरातील रस्ते गुळगुळीत होताना दिसत आहेत.

 

Khanapur road
पिरनवाडी ते झाडशहापुर हा राष्ट्रीयमार्ग 4 अ मध्ये मोडणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली होती. त्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

 belgaum

या अगोदर मच्छे यूथ चॅलेंजर्स आणि ग्रामस्थांच्या वतीनं स्वामी नगर कॉर्नरवर रस्ता रोको आंदोलने अनेक निवेदने देण्यात आली होती त्या आंदोलनाना केराची टोपली मिळाली होती मात्र आमदार खासदारांची वर्दळ वाढणार असल्याने हे रस्ते दुरुस्त होताना दिसत आहेत.

पिरनवाडी ते झाडशहापुर रोड वर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं होत या भागात झालेल्या अपघातात अनेक युवकांचे बळी गेले होते शेवटी शासनाला जाग आली असून रस्ता दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.