बार्थोलिन सिस्टयावर काही विशिष्ट ग्रंथी असतात. त्यांना बार्थोलिन ग्लँड असे म्हटले जाते. यामधे श्लेष्मा नावाचा साधारण स्निग्ध पदार्थ तयार करण्याचे काम करतो. काही वेळा या ग्रंथीतून स्रवलेला द्राव वाहून आणणार्या नलिका जाम होतात.
त्यामुळे द्रव साठून या ग्रंथी फुगतात. त्यांना बार्थोलिन सिस्ट असे म्हणतात. या ग्रंथी योनी मार्गाला ओलसर ठेवण्याचे काम करतात. अर्थात या ग्रंथीमध्ये गाठी निर्माण झाल्यास दाह होवून दुखायला चालू होते. स्त्रिया अशा गाठी झाल्यावर लाजेखातर डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी कचरतात. परंतु आजकाल कॅन्सरच्या धाकाने भितीने का होईना प्राथमिक अवस्थेतच वैद्यकीय सल्ला घेतला जातो.
लक्षणे-
स्त्रि भागाच्या आजूबाजूस गाठी येतात. आधी तो भाग ठणकायला लागतो. त्यानंतर घट्ट वाटण्यासारखी गाठ येते. क्वचित या गाठी औषधोपचारविनाच नाहीशा होतात. परंतु गाठी यायला लागल्यातर औषध घेऊनसुध्दा येऊच लागतात. यात इन्फेक्शन सहसा होत नाहीत. तरीदेखील या गाठी खूप मोठ्या होवू शकतात. अगदी लहान अंड्याएवढ्या गाठी येतात. बार्थोलिन ग्लँडच्या नलिकेमध्ये म्यूकस किंवा मळ साठल्यामुळे अशा गाठी उदभवतात अॅटिबायटिक्स देऊन किंवा सर्जरीने हा आजार बरा होत नाही.
होमियोपथी
सर्व प्रकारच्या अशा गाठींवर यशस्वी उपचार करता येतात.