महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी बेळगावला सीमावासीयांच्या महामेळ्याव्यात येऊन दिलेला शब्द पाळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी सीमावासीयांची बाजू मांडली आहे.
ही बाजू मांडण्यासाठी त्यांनी तीन पानी पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या भेटीनंतर ही माहिती मिळाली आहे.
बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यानंतर येथील मराठी बांधवांच्या व्यथा, त्यांची महाराष्ट्र सरकारकडून असलेली अपेक्षा याबाबत धनंजय मुंडे साहेबानी आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना ३ पानी सविस्तर पत्र दिले असून सरकारने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे अशी विनंती मुख्यमंत्र्याना केली.
या माहितीने संपूर्ण सीमाभागात चैतन्य पसरले आहे. यापूर्वी अनेकदा नेते आले आश्वासन दिले आणि विसरून गेले असे चित्र होते. पण स्वतः जातीने लक्ष घालून त्यांनी काम सुरू केल्याने आभार मानले जात आहेत.