आगामी लोकसभा काँग्रेस भाजपा दोन्ही पक्षांनी जोरात मोर्चे बांधणी सुरू केली असून बेळगाव लोकसभा मतदार संघात पात्र उमेदवार कोण असावा याची चाचपणी सुरू केली आहे.या मतदार संघात कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार द्यायचं झाल्यास त्याने मराठी भाषिकांची मत घेण्याची कुवत असली पाहिजे असाच उमेदवाऱ या निवडणुकीत सहज विजयी होऊ शकेल मात्र काँग्रेस पक्षाचा विचार करता विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावाचा विचार करता येईल.एकूणच भाजप आणि काँग्रेस मधून लोकसभेच्या घडामोडींना वेग आला आहे.
नुकत्याच झालेल्या विधान सभा निवडणुकीत एक लाखा पेक्षा अधिक मताधिक्यानी त्या विजयी झाल्या अधिक माहिती अंती येत्या लोकसभेसाठी भाजपच्या वतीनं विद्यमान खासदार यांना वाढता विरोध असून देखील त्यांचे नाव डावलले जाण्याची शक्यता कमी दिसते काँग्रेस पक्षाच्या वतीनं खासदार सुरेश अंगडी यांना प्रतिस्पर्धी म्हणून लक्ष्मी हेब्बाळकर याच एकमेव महिला कडी टक्कर देऊ शकतात मात्र या निवडणुकी साठी आपण इच्छुक नसल्याचे त्यांनी आधीच जाहीर केलं आहे.हाय कमांडच्या गोटात बेळगाव लोकसभेसाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याच नावाची चर्चा आहे.
एकूणच 2019 ची लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि महाआघाडी विरुद्ध भाजप अशीच होणार आहे काँग्रेस मधून मंत्री सतीश जारकीहोळी देखील इच्छुक आहेत पण सध्याचा विचार करता भाजप विरुद्ध मुकाबला करण्या इतका सक्षम उमेदवार काँग्रेसकडे नसून थोड्या अंशी भाजपची परिस्थिती देखील तीच आहे.जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत एकमेकात समनव्य नाही तीच स्थिति आमदार आणि खासदारांची आहे.आमदार खासदारां कडून पक्षाच्या कामाकडे पूर्ण पणे दुर्लक्ष झालेले दिसते त्यामुळेच केंद्रीय मंत्रिमंडळ पुन रचनेत बेळगावातून कुणालाच स्थान मिळालं नाही म्हणून नेते मंडळी नाराज देखील आहेत.केंद्रात सत्ता असून देखील कार्यकर्त्यांना लोक प्रतिनिधींनी चक्क वाऱ्यावर सोडलं आहे.केवळ मोदींच्या छायाचित्रांची ढाल पुढे करून नेत्यांना मतदारा समोर जावे लागत आहे.
विद्यमान खासदार सुरेश अंगडी या मतदार संघातून चौथ्यांदा प्रयत्नशील आहेत त्यांच्या गेल्या तीन टर्म चा विचार करता त्यांनी कोणतेच भरीव विकास कार्य केल्याचे दिसत नाही मात्र तिन्ही वेळा लाटे वर स्वार होऊन विजयी झालेत हे जगजाहीर आहे या काळात अंगडी यांनी केवळ एखादे लहान काम असले तरी ते आपणच केल्याचा दिखाऊपणा अधिक केला आहे व त्या कामाचं श्रेय घेण्याचा आटापिटा मात्र चालूच असतो.आश्चर्य म्हणजे गेल्या तीन वेळच्या कालावधीत केलेल्या विकास कामांचा आढावा देखील त्यांनी मतदारांना दिला नाही बिचाऱ्या मतदारांना खासदारांना प्रत्येक वर्षी पाच कोटींचा विकास निधी केंद्र सरकार कडून मिळतो मात्र मतदारांना याचे ज्ञान नाही त्यामुळं खासदार करतील ते सही अशी स्थिती झाली आहे. एकूणच खासदार सुरेश अंगडी यांच्या केलेल्या कामाचा विचार करता मतदारांत फार मोठ्या प्रकारची नाराजी दिसून येते व त्या विषयीचा अहवाल देखील हाय कमांडला प्राप्त झाल्याचे कळते त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व दुसरा पर्याय देखील शोधत आहेत. इतकेच काय तर एक वेळेला खासदार सुरेश अंगडी यांना समर्थपणे साथ देणारे दोन वेळा निवडुन आलेले ग्रामीण माजी आमदार संजय पाटील यांनी कडवं आवाहन उभे केले आहे. याशिवाय लोकसभा मतदार संघात आणि दिल्ली हाय कमांडकडे जोरदार लॉबिंग देखील सुरू केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी ते सतत संपर्कात आहेत त्यामुळं अंगडीना तिकीट वाटपावेळोवेळी हा एक मोठा अडथळा ठरणार आहे.
एकीकडे संजय पाटील आणि इतर लिंगायत उमेदवार तिकीट वाटपासाठी अंगडी यांना कडवी टक्कर देत असताना खासदारांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे जिल्ह्यातील प्रमुख भाजप नेते देखील त्यांच्या सोबत नाही आहेत अनेक कार्यकर्त्यानी ‘अंगडी हटाव भाजप बचाव’ ही मोहीम सुरू केली आहे.या सगळ्या घडामोडींमूळे नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार म्हणून शोध घ्यावा लागणार आहे.
जेष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे