सावगाव येथे घटना घडली आणि चार आजाणती कोवळी तरुण मुले गमावली. धोका झाला. न भरून येणारी ही हानी झाली असली तरी अशी हानी इतर कुणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून प्रयत्न झालेत. या घटनेतील एका मयत तरुणाच्या नातेवाईकांनी त्या घटनेच्या ठिकाणी धोका आहे असा फलक लावून इतरांना जागृत करण्याचा धोक्याची सूचना देण्याचा प्रयत्न सूरु केला आहे.
रविवारी हा फलक बसवण्यात आला. पोलीस निरीक्षक संगमेश यांच्या उपस्थितित चैतन्य भांदुर्गे याच्या नातेवाईकांनी हा फलक बसवला. इतर कुणाची मुले या ठिकाणी जाऊन अशी दगावली जाऊ नयेत हा उद्देश या मागे आहे.
सरकार आणि प्रशासनाने काहीतरी करावे ही अपेक्षा असते. पण तसे होत नाही. या घटनेच्या वेळीही असाच अनुभव आला. मग चैतन्य च्या कुटुंबीयांनी स्वतःच्या खर्चातून हा फलक उभारण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण पोलीस निरीक्षक संगमेश,सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते दीपक नार्वेकर व इतरांनी त्यांना सहकार्य केले.
जिल्ह्यातील सर्व तलावांना तारेचे कुंपण घाला आणि तलावा जवळ जनजागृती फलक बसवा अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे यांनी जिल्हा पंचायत बैठकीत केली होती जिल्हा प्रशासन करायच्या आतच सावगाव तलावात मयत झालेल्या चैतन्य याच्या कुटुंबियानी हा फलक बसवून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय.