शॉर्ट सर्किट मुळे आग लागून घराचे नुकसान झालेल्या यळगुकर कटुंबास अनेकजण मदतीचा हात देताहेत.बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी गावात आग लागल्याने गावडू यळगुकर आणि कृष्णा यळगुकर यांच्या घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते त्यामुळं या कुटुंबातील सदस्यांचा संसार उघड्यावर पडला होता.
शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत गावडू यांच्या घरातील पन्नास हजार किंमतीचे कपडे रोख रक्कम आणि भांडी,तब्बल सात लाख 50 हजार किंमतीचे 25 तोळे सोन्याचे दागिने,सहा हजार किंमतीचे चांदीचे सामान,दहा क्विंटल भात अंदाजे किंमत15 हजार, तर विनोद यांच्या घरातील 25 हजारांची भांडी कपडे रोख रक्कम,10 तोळे अडीच लाखांचे सोन्याचे दागिने,15 पोती भात असे दोन्ही मिळून अंदाजे 12 लाखांचे नुकसान झालं होतं.
सोमवारी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी जळीत घराची पहाणी करून आर्थिक मदत केली.या कुटुंबातील सदस्यांना भाग्योदय संस्थेने तसेच आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही आर्थिक मदत केली आहे.या घटनेतून सावरण्यासाठी या घरातील लोकांना आणखी मदतीची गरज असून शासनाने देखील मदत करावी अशी मागणी होत आहे.