बेळगाव प्रश्नी कृती करा अन्यथा समनव्यक मंत्री पदाचे खाते गोठवा अशी मागणी करत मुंबई येथील आजाद मैदानावर युवा समितीने ठिय्या आंदोलन केल्या नंतर समनव्यक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना जाग आली असून आगामी 12 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक आयोजित करू असे आश्वासन दिले आहे.
दादा पाटील यांनी समानव्यक मंत्री म्हणून एकदाही बेळगावातील मराठी जनतेच्या बेळगावात येऊन भावना जाणून घेतल्या नव्हत्या त्यामुळे त्यांच्या वर टीका झाली होती शेवटी त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिलं आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी मध्यवर्ती समितीच्या शिष्टमंडळा बरोबर चर्चा करत 12 रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
मागील वेळी बेळगाव विमान तळावर झालेल्या भेटीतील चर्चे प्रमाणे भाषिक अल्पसंख्याक अहवालावर हिवाळी अधिवेशनात लोकसभेत चर्चा घडवून आणणे महाराष्ट्राचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान यांना भेटणें, मराठा आरक्षणासाठी बेळगावातील 865 गावे समविष्ट करणे,तज्ञ समितीची बैठक दर दोन महिन्यांनी घेणे कोर्टाच्या तारखेवेळी शासनाचा अधिकारी किंवा मंत्री उपस्थित राहणे आदी विषयावर बेळगावातील शिष्टमंडळाने चर्चा केली.