बेळगाव शहरात आणि त्यातल्या त्यात खडे बाजार पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात रात्रीच्या वेळी समाज कंटकांनी हैदोस घातला असून रात्रीच्या वेळी घरा समोर लावलेल्या गाड्या फोडणे आणि चोरीच्या घटना वाढ झाली आहे.
रामलिंग खिंड गल्लीत लावलेल्या स्विफ्ट कारचे टायर चोरी केलेली घटना ताजी असतानाच शेरी गल्ली,मुजावर गल्ली भागातील कार आणि ऑटो रिक्षांच्या काचा फोडण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
सोमवारी सकाळी रस्त्या शेजारी समोर पार्क केलेल्या दोन कार एक ऑटो वर दगडफेक करून काचा फ़ोडण्यात आल्या आहेत.रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असून या भागातील जनता संतप्त झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच खडे बाजार पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांनी काचा फोडलेल्या गाड्यांची पहाणी करून पंचनामा केला.हेमू कलानी चौकात लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात गाड्या फोडणारे समाज कंटक कैद झालेत का याचा तपास पोलीस करत आहेत.
चोरी आणि गाडी फोडण्याच्या घटनेत वाढ झाल्याने जनतेत पोलिसच विरोधात संताप असून रस्ता रोको करण्याचा इशारा देखील या भागातील लोकांनी दिलाय वेळीच पोलिसांनी योग्य तपास करून अश्या घटना वर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.