माजी आमदार संभाजी पाटील यांचे पुत्र सागर संभाजी पाटील रा.बेळगाव यांचे बंगळुरू जवळ यशवंतपूर येथे रेल्वेत अपघाती निधन झाले आहे.
सोमवारी रात्री ते राणी चन्नम्मा एक्सप्रेसने बंगळुरूहून बेळगावकडे येत असता रेल्वेतुन खाली कोसळल्याने मृत्यू झाला असावा असा संशय रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे.बंगळुरू येथील कोर्ट केस साठी सागर पाटील यांच्या सह त्यांचे अनेक सहकारी मित्र बंगळुरूला गेले होते बेळगावला परतत असतेवेळी ही घटना घडली आहे.
दत्ता जाधव आणि अमोल देसाई हे बसने तर माजी महापौर आप्पासाहेब पुजारी,माजी उपमहापौर संजय शिंदे यांच्यासह संजय सातेरी हे देखील त्यांच्या सोबत रेल्वेने बेळगावकडे येत होते. जेवण करण्यासाठी सगळे जण बसले असता सागर फ्रेश होण्यासाठी शौचालयाला गेले ते वापस आलेच नाहीत शेवटी बराच उशीर झाल्यावर त्यांना फोन लावण्यात आला तो फोन पोलिसाने उचलला त्यानंतर ही घटना सगळ्यांना कळली.दरम्यान बस मधून बेळगाव कडे निघालेले दत्ता जाधव हे प्रवास अर्धवट टाकून घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी याची माहिती सर्वांना दिली.
नुकताच किडनीच्या आजारातून सावरलेल्या माजी आमदार संभाजी पाटील यांना हा मोठा धक्का आहे.
यशवंतपुर स्टेशन जवळ २५ फूट खोल रेल्वे ब्रिज खाली सागर हे पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती हाती आली आहे. बेळगाव live ला मध्यरात्री ही दुःखद माहिती प्रसिद्ध करताना अतीव दुःख होत असून पोलीस या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास करतील ही अपेक्षा आहे.