जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा देताच दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला रस्त्याचे काम सुरू करावेच लागले आहे. पूजन करून काम सुरू होताच आंदोलन मागे घेण्यात आले. नाक दाबताच तोंड उघडते याचा प्रत्यय या आंदोलनाने करून दिला आहे.
आज सकाळी आंदोलन सुरू केल्यापासून सरस्वती पाटील यांच्यावर दबाव आणून आंदोलन बंद पाडवण्याचा प्रयत्न झाला पण त्यांनी रस्त्याचे काम सुरू होई पर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली. महिला पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्नही झाला यावेळी त्यांचा हात एक महिला पोलिसाने पिरगाळला, हात दुखत असताना सुद्धा आणि त्याची सूज वाढली तरी सरस्वती पाटील या आपल्या समर्थकांसोबत बसून राहिल्या होत्या.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर पुत्र मृणाल हेब्बाळकर यांनाही आंदोलनाच्या ठिकाणी यावे लागले. आपण सुद्धा हा रस्ता सुरू होईपर्यंत या आंदोलनात बसून राहू असे त्यांनी जाहीर केले. सत्तेवर असणाऱ्या आणि या रस्त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रत्येक आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्याविरोधात हे आंदोलन होते.
अखेर दुपारी रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून हे काम सुरू झाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.डिसेंम्बर 25 रोजी कंग्राळी खुर्द गावची यात्रा आहे त्याच्या पाश्वभूमी वर रस्त्याचे दुरुस्ती सुरू झाली असून फेब्रुवारी पर्यंत ए पी एम सी ते हंदीगणूर गावा पर्यंत नवीन रोड बनवू असे ठोस आश्वासन मिळाले आहे.