राज्याचे पर्यावरण आणि वन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी खाते वाटप झालेल्या दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
कृषी,वन,महसूल,पाणी पुरवठा आदी खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी विकास कामांचा अहवाल सादर केला त्यावेळी कामांची गती वाढवा अश्या सूचना त्यांनी दिल्या.
अनेक खात्यात कामे प्रलंबित आहे कामात प्रगती आणा अश्या सूचना केल्या असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. दोघे मिळून काँग्रेस साठी काम करू यावर मी रमेश जारकीहोळी यांना विश्वासात घेऊन काम करतो अजून त्यांच्याशी बोलण झालं नाही असेही ते रमेश जारकीहोळी यांच्या बद्दल म्हणाले.
रमेश यांची मनधरणी करण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतील रमेश यांच्या मुळे संमिश्र सरकारला धोका नाही असा निर्वाळा देत त्यांनी सरकार स्थिर आहे असेही नमूद केलं