Tuesday, June 25, 2024

/

‘शहापूर रस्त्याची लागली वाट’

 belgaum

एसपीएम रोड संपताच शहापूर कडे पुढे जाताना बँक ऑफ इंडिया कॉर्नर पासून सुरू झालेली खुदाई शहापूर खडेबाजार नाथ पै सर्कल रस्त्याची वाट लावून जात आहे. यामुळे रहदारीला अडचण आणि रस्त्याची दुर्दशा होत आहे.

 

Shahapur road
खोदल्यानंतर काम झाल्यावर परत मुजवून रस्ता पहिल्यासारखा सरळ केला जात नाही. यामुळे नागरिकांना ये जा करणे अडचणीचे जात आहे. नागरिकांनी या रस्त्यावरून कशी ये जा करायची हेच कळत नाही त्यामुळे दिवसा आणि रात्री सतत ट्रॅफिक जॅम होत आहे.हे काम करणाऱ्या व्यक्तींनी रस्ता पुन्हा पहिल्यासारखा करून द्यावा अशी गरज आहे.

 belgaum

शहापूर खडे बाजारचा रस्ता हा बाजाराचा रस्ता नेहमी वर्दळीचा रस्ता असतो यु जी डी केबल साठी खुदाई सुरू असल्याने तर ट्रॅफिक जाम होतच आहे काढलेला खड्डा बुझवल्या नंतर देखील योग्य पध्दतीने सपाटीकरणं न केल्याने वाहतुकीसाठी अर्ध्या रस्त्याचा वापर होत आहे त्यात देखील रहदारी साठी अडथळा होत आहे.अधिकारी पालिका प्रशासन लोकप्रतिनिधी अधिवेशनात व्यस्त असल्याने याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.