Friday, April 19, 2024

/

सेल्फी व्हिडीओ काढून आत्महत्या!

 belgaum

आत्महत्या हा समर्थनीय उपाय नाही. पण अनेकदा त्रासात अडकलेले लोक आत्महत्येचा मार्ग निवडतात. अशाच एक तरुणाने आपल्या प्रेयसीच्या कुटुंबाच्या त्रासाला कंटाळुन विष पिऊन आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या करताना त्याने आपला सेल्फी व्हिडीओ काढला असून या प्रकाराने खळबळ माजली आहे.

Suicide selfie

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील कोर्विनकोप्प येथे ही घटना घडली आहे. मंजुनाथ येणगी ( वय २६) असे त्या तरुणाचे नाव आहे. गावातीलच एक मुलीवर त्याचे प्रेम होते. ही घटना त्याच्या प्रेयसीच्या घरी कळल्यापासून त्यांनी त्याला नाहक त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्याच्याकडे १० लाख रुपयांची मागणीसुद्धा करण्यात आली होती.

 belgaum

यापैकी ७ लाख रुपये त्याने दिले होते पण बाकीचे पैसे देण्यास तो असमर्थ ठरला होता पण नाहक त्रास वाढल्याने त्याने आत्महत्येचा मार्ग निवडला आहे.बैलहोंगल पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली असून तपास करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.