म्हशी पळण्याची शर्यत सुरू असताना लाल पिवळा ध्वज आणि भगवा ध्वज फिरवणाऱ्या युवकांत संघर्ष होऊन दोन गटात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक युवकाना मार खावा लागल्याची घटना सरदार मैदानावर घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सरदार मैदानावर गवळी बांधवांच्या वतीनं म्हशी पळवण्याची शर्यत आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमा दरम्यान एका गटाने भगवा तर दुसऱ्या गटाने लाल पिवळा ध्वज आणला होता लाल पिवळे आणि भगवे ध्वज युवकां कडून मैदानात फिरवण्यात येत होते त्या दरम्यान लाल पिवळा ध्वज भगव्या ध्वजाला हवेत आदळला त्यामुळे या दोन गटात संघर्ष सुरू झाला होता.
एका गटाकडून दुसऱ्या गटाच्या युवकाला मारहाणं देखील झाली होती एक गट एका बाजूने तर दुसरा गट एका बाजूने थांबला होता त्यावेळी एका गटाने दगडफेक केली त्यामुळं गोंधळ निर्माण झाला मग परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांना लाठीमार करावा लागला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी केवळ एका गटाच्या मुलांना टार्गेट केल्याचे दिसून आले.दरम्यान ऐन सणात ही घटना घडल्याने सरदार मैदान परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.धार्मिक सण सुरू असताना भगवे किंवा लाल पिवळे ध्वज मैदानात फिरवणे कितपत योग्य असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.लोकसभा निवडणुक जवळ आल्याने तथा कथित युनिटी वाल्यामुळं हा प्रकार झाल्याची देखील चर्चा सुरू आहे.