बैठकीचा अजेंडा बनवताना विश्वासात न घेतल्याचा मुद्दा उचलत मराठी नगरसेवकांनी सभात्याग करून बैठक तहकूब केली.यावेळी सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेवकात संघर्ष झाला त्यावेळी नगरसेवकांनी आपल्या जागेवर उठून सभात्याग केला.
शनिवारी बेळगाव महा पालिकेची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मराठी गट नेते संजय शिंदे आणि नगरसेवक पंढरी परब यांनी केवळ एका गटाच्या नगरसेवकांच्या समस्या विषय पत्रिकेत आहेत कोणत्याच नगरसेवकाला विश्वासात घेऊन का विषय पत्रिका बनवली नाही असा संतप्त सवाल केला त्यावेळी सभागृहात एकच गदारोळ माजला होता.
मराठी नगरसेवक बाहेर पडताच महापौरांनी बैठक दुपार पर्यंत तहकूब केली.दुपार नंतर च्या सत्रात शहरातील विविध चौकांचे नामकरण विषय घेतले जाणार आहेत याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.एका आमदाराने बैठकीत महापौर आमदारांना का बोलवत नाहीत न माहिती देत सभागृहात बैठक घेत आहेत आपण का हक्क भंग आणू नये असा प्रश्न महापौराना केला त्यावर महापौर बसप्पा चिखलदिनी यांनी आपण जाणून बुजून असे केले नसून बाहेर जागा नसल्याने बैठक सभागृहात घेतली असल्याची माहिती दिली
सकाळी सुरुवातीला माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी,माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार,स्वातंत्र्य सैनिक गुर्जर आणि मननोळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.