वैद्यकीय परिभाषेमध्ये लायकेनचा अर्थ लहानशी घट्ट असलेली पुळी किंवा छोटासा फोड, प्लेनस म्हणजे चपटा चपटा फोड किंवा पुळी म्हणजेच लायकेन प्लेनस मग यात काय नवीन आहे?
लायकेन प्लेनसचे फोड चकचकीत जांभळट हिरवट रंगाचे असतात. हा प्रकारसुध्दा मागील एका लेखात सांगितल्याप्रमाणे एएआर अर्थात अँटीजेन अँटीबोडी रिअॅक्शनच्या नमुन्याचा असतो. म्हणजे स्वतःच्याच पेशी स्वतःच्याच पेशींना विरोध करतात. काही औषधे उदा. क्लोरोक्किन, गोल्ड, मिथाईल डोपा व इतर यामुळेसुध्दा हा विकार होऊ शकतो. मायेस्थेनिया गे्रव्हिस, अल्सरेटिव्ह कोलायटीस, डायबेटीसमध्ये अशा पुळ्या येऊ शकतात. क्वचित हा विकार अनुवंशिकपण असू शकतो.
लक्षणे- पहिल्यांदा छोटासा फोड येतो. गोर्या त्वचेवर हा फोड चकचकीत जांभळा दिसतो तर सावळ्या त्वचेवर निळसर काळा. फोडावर पांढर्या रेषासुध्दा दिसतात. खपलीसारखे घट्ट आवरणसुध्दा नंतर तयार होते. मनगटावर, घोट्याच्या आजूबाजूला व पोटापाठीवर असे अनेक फोड आढळू शकतात. कधीकधी डास चावल्यानंतर, मार लागल्यानंतर अशा पुळ्या उळू शकतात. केसामध्येही असे घट्ट घट्ट फोड येतात. नखांवर दाट आवरण तयार होऊन खडबडीतपणा येतो. तोंडामध्येसुध्दा असे फोड येऊ शकतात. नखांवर व तोंडामध्येसुध्दा असे फोड येऊ शकतात. नखांवर व तोंडामध्ये हे चट्टे लेस लावल्यासारखे दिसतात. तोंडामधील फोड दुखणारे असतात. यामध्येही अक्युट सबअक्युट आणि क्रानिक प्रकार असतात. हे फोड घट्ट खडबडीत होऊन वर्षानुवर्षे राहू शकतात. क्वचित ह्या रोगाचे रूपांतर त्वचेच्या कर्करोगातही होऊ शकतो.
उपचार- या आजाराचा उपचार फक्त होमिओपॅथीमध्येच आहे. बर्याचदा अशा फोडाचा उल्लेखही रूग्णांकडून केला जात नाही. परंतु त्यावर उपचार करणे आवश्यक असते.
!