दिवाळीत किल्ला बनवताना वेगवेगळ्या जागा निवडल्या जातात. गल्लीच्या कोपऱ्यावर, घरात जिन्याखाली तर आणि कुठे मुले केला बनवत असतात. बेळगावच्या रामदेव गल्लीतील एक आज्जी व नातीने आपला किल्ला घराच्या टेरेस वर बनवला आहे. हा किल्ला बघण्यासाठी गर्दी होत आहे.
यातल्या आजी आहेत माजी नगरसेविका लालन प्रभू आणि त्यांची नात आहे इरा प्रभू. रायगड बनवून त्यावर शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांच्या भेटीचा प्रसंग त्यांनी दाखवला आहे.
लालन प्रभू यांनी आपल्या टेरेसवर सुंदर बाग बनवली आहे. या बागेत सध्या किल्ला सुद्धा बनवण्यात आला आहे. हा किल्ला इतर किल्ल्यापेक्षा वेगळा ठरत आहे.
जुनी घरे जाऊन सिमेंटची घरे आली आणि परंपरा जपायला जागा मिळत नाही पण तरीही मिळेल त्या जागेत आपली कला वापरून पुढच्या पिढीला जुना आनंद मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे.