बेळगाव शहरात तसेच उपनगरात देवींची अनेक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराला एक इतिहास आहे यातीलच एक शहापूर येथील अंबाबाई मंदिरही अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मागील 115 हुन अधिक वर्षाची परंपरा लाभलेल्या या मंदिराला आजही अनन्य साधारण महत्व आहे.
नवरात्रोसवाला या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 100 वर्षांपासून भाविकांनी ही परंपरा जपली आहे. मांगल्य आणि चैतन्य देणारी देवी म्हणून याकडे पाहिले जाते.
शहापूर येथील बॅ नाथ पै सर्कल खडेबाजार शहापूर येथील सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे अंबाबाई मंदिर हे पंचक्रोशीत नावलौकिक आहे आणि ख्याती ही आहे ही देवी अनेकांचे श्रद्धास्थान असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. सध्या शारदीय नवरात्रोसवाला घटस्थापनेपासून सुरुवात झाली असल्याने या मंदिरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या मंदिराचा महिमा अपरंपार आहे. अनेकांचे आराध्य दैवत असल्याने येथे भाविकांची गर्दीही कायमचीच. नावरात्रोसवात येथे विधिवत पूजा अरच्या करण्यात येते. अनेक भाविक येथे मोठया श्रद्धा आणि निष्ठेने येते आपली मागणी मांडता व ती मान्यही होते, अशी ख्याती या देवीची आहे.नऊ दिवसात दररोज वेगवेगळ्या अवताराची देवीची आरास केली जाते.पहिल्या दिवशी मत्स्य तर दुसऱ्या दिवशी कमळ आरास केली आहे.
पं विश्वनाथ देव, आचार्य कुशोरजी व्यास, पं भुपेंद्रभाई पंड्या, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, इ. संत आदी महंत व दिवंगत जणांनी या मंदिरात अभिषेक केला आहे. त्यामुळे या मंदिराची ओळख साऱ्या पंचक्रोशीत झाली आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारी देवी म्हणून या देवीचा महिमा आजही तसाच आहे. नवरात्रोसवात देवीचा जागर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.