बेळगाव ते खानापूर दरम्यान चौपदरीकरण काम करणाऱ्या अशोक कंपनीचा बेजबाबदारपणा वाढला आहे. माती वाहून नेणाऱ्या ट्रक चा मागचा फाळका उघडा ठेऊन रस्त्यावरून ये जा सुरू आहे. यामुळे नागरिकांच्या डोळ्यात आणि अंगावर धूळ उडत आहे. तसेच मातीचे ढिगारे रस्त्यावर पडून वाहन चालक पडण्याचा तसेच गंभीर अपघात होण्याचा धोका जास्त आहे.
खानापूर ते गोवा या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू होत असून यापैकी बेळगाव ते खानापूर या टप्यातील काम अशोका या कंपनीला दिले आहे. या कंपनीने आपल्या ट्रक मधून माती घेऊन जाताना योग्य काळजी घेतली नाही त्यामुळे अनेक मोटारसायकल चालकांना याचा त्रास झाला असून बरेच जण मरता मरता वाचले आहेत.
आज दुपारी काही मोटारसायकल स्वारानी हे ट्रक अडवून समजावण्याचा प्रयत्न केला असता तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही आम्हाला पाहिजे तसे वागणार असे सांगितले आहे. नागरिक यामुळे भडकले असून असे फाळका उघडा ठेऊन जाणारे ट्रक घातक असून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
अशा बेजबाबदार कंपनीला हटवा आणि चांगले जबाबदारीने काम करणारी कंपनी नेमा अशी मागणी नागरिक करत आहेत. आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे.