मराठा इन्फ्रन्ट्रीला शौर्याचा इतिहास-मराठा जवानांनी ही परंपरा कायम ठेवावी असे आवाहन :लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केले.मराठा म्हणजे इतिहास , मराठा म्हणजे जिद्द, साहस आणि अभिमान. हा एक शूर विरतेचा इतिहास आहे. ही परंपरा कायम ठेवावी. लष्कर प्रमुख बिपीन रावत बोलत होते. येथे शंभराव्या शरकत दिन सोहळ्यात ते बेळगाव मध्ये बोलत होते.
मराठा लाईट इंफंट्री चे कर्नल लेफ्टनंट जनरल पी जे एस पंनु यांचा उल्लेख करतांना त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नावांचाही उल्लेख केला. शरकत दिन निमित्त आपल्या लेझीम व इतर कलांचे दर्शन करून दिलेल्या जवानांचा त्यांनी कौतुकाने उल्लेख केला.
मराठा ने देश भरात उज्वल कामगिरी केली आहे. आपले नाव रोशन केले आहे. देशाचे नाव उज्वल केले आहे आणि यापुढेही ही परंपरा कायम राहील असे गौरवपर भाषण केले. छत्रपती शाहू महाराजांनी मराठा सेंटरचा कुस्तीपटू हवालदार सोनांक गोंगाई यास विश्व कुस्ती स्पर्धेत यश मिळवल्या बद्दल एक लाखांचं बक्षीस दिल.
कोल्हापूर चे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, कुरुंदवाड संस्थानचे महाराजा पटवर्धन, युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराज कुमार युवराज, युवराज मालोजी राजे, कॅप्टन शिवाजी महाडकर, निवृत्त ब्रिगेडियर रणजितसिंह मिश्रा मान्यवर उपस्थित होते.