belgaum

बससाठी विद्यार्थी रस्त्यावर

0
318
Road jaam
 belgaum

बससाठी विद्यार्थी रस्त्यावर!कर्नाटक परिवहन महामंडळाने कंग्राळी येथे वेळेत आणि सूरळीत बस पुरवठा केला नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी रास्तारोको करून निषेध व्यक्त केला. विविध खात्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले खरे पण चार दिवसात येथील बस सुरळीत चालू झाल्या नाहीत तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

कंग्राळी खुर्द येथे अनेक महिन्यापासून बस सुरळीत करण्यात आल्या नाहीत. दुसऱ्या गावावरून जाणाऱ्या बस ही येथे थांबवत नाहीत.त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तसेच येथील वाहकही विद्यार्थ्यांशी चांगली वर्तवणूक करत नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, असे सांगण्यात आले.

Road jaam

यापूर्वी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. या गावाला सकाळीच्या सत्रात ४ बस फेऱ्या व सायंकाळच्या सत्रात ४ बस फेऱ्या सोडण्यात याव्यात असे निवेदनही देण्यात आले होते. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करून विद्यार्थी व नागरिकांची हेळसांड करण्यातच धन्यता मानतात. याला वैतागून कंग्राळी येथील विद्यार्थी व नागरिकांनी आंदोलन छेडले. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि यापुढे सुरळीत बस पुरवठा करू, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, एपीएमसी चे पोलीस निरीक्षक जे एम कालिमिर्ची, आर आय पाटील, चेतक कांबळे, तालुका पंचायत सदस्या मनीषा पालेकर, ग्राम पंचायत अध्यक्ष चंदा पाटील, यल्लप्पा पाटील, सचिन शिवनगेकर, महेश पालेकर, महेश खंडागळे, सुनीता जाधव, उमेश चौगुले, पुंडलिक पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.