स्वच्छ टवटवीत त्वचा पहायला सुध्दा सुंदर असते आणि आरोग्यपूर्ण देखील असते. थोडक्यात त्वचा ही आपल्या आरोग्याची द्योतक असते. चांगली त्वचा म्हणजे चांगले आरोग्य असे समसजायला हरकत नाही.
आहार, विहार, विचार, उपचा ह्या चार गोष्टींमुळे त्वचेवर पडसाद उमटत असतात. अलीकडे चेहर्यांच्या त्वचेच्या तक्रारी इतक्या वाढल्या आहेत की विचाराची सोय नाही. त्याचे कारण म्हणजे रसायनयुक्त प्रसाधनांचा मारा आणि अन्नधान्यातील भेसळ व आहाराच्या विचित्र सवयी. वेळी अवेळी खाणे, बाजारातील पॅकबंद आहार सातत्याने घेणे, आहारात फायबरचे प्रमाण अत्यल्प असणे यामुळे पचनाच्या तक्रारी वाढतात व त्यामुळे त्वचा स्वच्छ रहात नाही. त्यामुळेच मुरूम, वांग, काळे डाग, खरबरीत चट्टे, पांढुरके डाग यांचे प्रमाण त्वचेवर वाढू लागते. साधारणतः वयाच्या तेराव्या वर्षापासून मुरूम (तारूण्यपिटीका) यायला सुरूवात होते. त्याला शरीरातील हार्मोन्स अचानक वाढल्याने कारण असते. तेलकट त्वचेवर मुरूम (पिंपल्स) खूप येतात. त्यातच केसात कोंडा असेल, जेवणात तेलकट पदाथ्र खाण्याचे प्रमाण जास्त असेल तर मुरमांच्े प्रमाणही वाढते. मुरूम तीन प्रकारचे असतात. साधे नुसतक पुरळ असणारे, पू भरून ठसठसणारे आणि अगदी मोठे न जाणारे न फुटणारे पण डाग सोडणारे मुरूम. यांची वैद्यकीय नावे वेगवेगळी आहेत लक्षण महत्वाची. असे मानले जाते की कोरडी किंवा नॉर्मल त्वचा तारूण्यात सुंदर दिसते. पण या त्वचेला म्हातारपण लवकर येते. त्या उलट तेलकट त्वचा तारूण्यात मुरूमांनी भरते पण म्हातारपणातही लवचिक राहते. योग्य काळजी घेण्याने दोन्ही प्रकारची त्वचा चिरतरूण व टवटवीत राहू शकते.
मुरूम फोडणे, व्हाईट हेडस; ब्लॅक हेडस फोडणे सर्वस्वी चुकीचे आहे. त्याकरिता त्वचेवरून सौंदर्य उपचार व होमिओपॅथिक उपचार केल्याने दुहेरी फायदा होतो.
तेलकट त्वचा, नॉर्मल त्वचा व कोरडी त्वचा यावर करायचे उपचार पूर्णतः भिन्न असतात. आहारात करायचे बदलही वेगवेगळे असतात या त्वचेवर वापरायची उपचार सौंदर्य प्रसाधनेदेखील निराळी असतात. त्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. बाजारात त्वचा उजळणारी क्रिम्स असतात. त्यामध्ये हमखास ब्लिच मिसळलेले असते. त्यामुळे त्वचेची लवचिकता खराब होऊन रूक्षता येते. त्वचा पॅची होते म्हणजे काळ्या पांढर्या तुकड्यांनी जोडल्यासारखी दिसते. यावर होमिओहर्बल इलाज केल्याने त्वचा पूर्ण पूर्ववत सुंदर होते. रंग सावळा असो, गव्हाळ असेा वा गोरा असो जी त्वचा जन्मजात मिळाली आहे. त्यात काही फेरफार करण्याचा प्रयत्न करू नये, पण असणारा रंग तुकतुकीत, तजेलदार कसा दिसेल यावर लक्ष द्यावे. होमिओपॅथीक मॉईस्टरायझर वापरल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहतो. सूर्यकिरणांनी त्वचेची होणारी हानी थांबते व होणारी हानी टाळता येते. स्त्री व पुरूष दोघांची त्वचा अतिशय भिन्न स्वरूपाची असते. स्त्रिया काहींना काही करून त्वचेची काळजी घेत असतात. पुरूष वर्गानेसुध्दा त्वचेची काळजी घेतली पाहिजे. आजकालच्या जगात प्रेझेंटेबल राहणे, पर्सनॅलिटी अप टू डेट ठेवणे सगळ्यांनाच आवश्य आहे. मुरूम आल्यास डाग पडू नयेत, चेहरा खडबडीत दिसू नये म्हणून युवक वर्गानेही तितकीच काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.