स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या राणी कित्तुर चननम्मा यांची जयंती काल जिल्हा प्रशासनाच्या वतीने काकती येथे करण्यात आली तर कित्तुर येथे उत्सव सुरू आहे.संमिश्र सरकारने कित्तुर उत्सवासाठी यावर्षी 34 लाखांचे अनुदान मंजूर केले असून ते अपुरे पडत असल्याने राज्य सरकारने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकिहोळी यांनी केली आहे.
केंव्हाही अश्या प्रकारचे राष्ट्रीय उत्सव साजरे करत असताना आर्थिक निधी पेक्षा लोकांचा सहभाग महत्वाचा असतो केवळ सरकारी निधीद्वारे आर्थिक उधळपट्टी न करता खऱ्या अर्थाने जनोत्सव करण्याची गरज आहे.मुख्यमंत्री एस बंगरप्पा यांच्या काळात त्यांनी आपल्या कारकिर्दीत कित्तुर विकास प्राधिकरणाची स्थापना करून वीस कोटींचा निधी मंजूर केला होता व त्या निधीचा उपयोग केवळ रस्ते चकाचक करण्यासाठी घालण्यात आला चौकाना रंग रंगोटी करून विद्युत रोषनाईची सोय करून केवळ दिखाऊपणा करण्यात आला होता त्यावेळी आता पर्यंत झालेल्या पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि लोक प्रतिनिधींनी राणी चननम्मा यांचा राजकीय साठी वापर केलाय.
प्रत्यक्षात ज्या काकती गावात राणी चननम्मा यांचा जन्म झाला ते जन्म स्थळ आजही दुर्दशा अवस्थेत आहे दरवर्षी भाजप काँग्रेसचे लोक जयंती निमित्य जन्म स्थळाचा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करू अशी भाषण ठोकून जातात मात्र त्याचा पाठपुरावा करताना दिसत नाहीत.
दरवर्षी त्यांना 23 ऑक्टोबर रोजी राणी चनम्मा यांची त्यांच्या शौर्याची योगदानाची आठवण येते तीच परिस्थिती कित्तुर येथील चननमा यांचा किल्ल्याची भग्नावस्थेची आहे कोणत्याही प्रकारची डागडुजी या किल्ल्याची झालेली दिसत नाही. या सर्व गोष्टींमुळे जनमानसात राज्य सरकारच्या या भूमिकेच्या विषयी नाराजी व्यक्त होताना दिसते.काल चिकोडीचे खासदार प्रकाश हुक्केरी यांनी कित्तुर राणी चननमा जन्म स्थळाचा विकास करू अशी घोषणा केली आहे या घोषणेचा लोकांना कंटाळा आला असून लोकप्रतिनिधी अशी आश्वासने देऊ नये अशी मागणी केली जात आहे.