एक नोव्हेंबरचा राज्योत्सव दिन व त्याला जोडूनच समितीच्या वतीने पाळण्यात येणारा काळा दिन तोंडावर असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बेळगावच्या धावत्या दौऱ्याला आज विशेष महत्व प्राप्त झाले होते.
शेजारील महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यां कडून बेळगाव सांबरा विमान तळाचा वापर आपल्या प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी होत असतो त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी आपल्या नियोजित दौऱ्या निमित्त बेळगावला धावती भेट दिली त्यावेळी आश्चर्य म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्यांच्या स्वागतासाठी अख्खे जिल्हा प्रशासन उपस्थित होते.
गेल्या पन्नास वर्षाच्या काळातील अश्या प्रकारे बेळगाव जिल्हा प्रशासना कडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे मोठे स्वागत करण्याची बहुदा पहिलीच घटना असावी.महाराष्ट्राचे बहुतेक प्रमुख मंत्री केंद्रीय मंत्री दौरा जाहीर न करता परस्पर येतात व निघून जातात मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांचा अधिकृत कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाल्याने त्यांच्या स्वागतासाठी अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी ते पोलीस आयुक्तां पर्यंतचे सर्व अधिकारी झाडून उपस्थित होते.यातील बऱ्याचश्या अधिकाऱ्यांनी त्यांचं पुष्प गुच्छ देऊन स्वागत केलं तर अलिकडेच नियुक्त झालेल्या जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी दोन्ही हात जोडून सुहास्य वदने स्वागत केलं.यावेळी प्रांताधिकारी कविता योगप्पनावर,पोलीस अधीक्षक सुधीर कुमार रेड्डी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांसोबत सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी विशेष विमानाने बेळगावं विमान तळावर दाखल झाले तर दहा वाजून पंधरा मिनिटांनी रनवे वरूनच हेलिकॉप्टरनी मिरज कडे रवाना झाले.