बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखानदार ऊस बिलांच्या बाबतीत शेतकऱ्यांना फसवत आहेत. नवा गळीत हंगाम तोंडावर आलेला असताना जुनी बिले मिळायची आहेत. ऊस उत्पादक शेतकरी कायम आंदोलन करत आहेत, अशावेळी जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
नूतन जिल्हाधिकारी एस बी बोमनहळी हे सुद्धा या प्रश्नांत अडकत चालले आहेत. शेतकऱ्यांची आंदोलने पाहून जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांना त्यांनी बैठकीला बोलावले होते पण आम्ही कुणाचीच बिले देणे नाही असे सांगण्यात आले आहे. परंतु शेतकरी दररोज आंदोलने करत असून शेतकऱ्यांनी कुठल्या कारखान्याने बिल द्यायचे आहे तो तपशील द्यावा अशी विनंती आता जिल्हाधिकाऱ्यांना करावी लागत आहे.
जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या आढाव्यात घटप्रभा साखर कारखान्याने ६ कोटी आणि मलप्रभा साखर कारखान्याने १२ कोटी इतकी बिले देणे बाकी आहे. ही बिले देण्यासाठी मलप्रभा साखर कारखान्याने १० कोटी इतके कर्ज मागितले आहे.
यंदा चा गळीत हंगाम २५ तारखेपासून सुरू होत आहे. तो सुरू होण्यापूर्वी मागची बिले भागवा अशी मागणी होत आहे.