आतुर धावत आलो, तव दर्शनाला।
शिवबा समान मातीं हृद धुती दे आम्हाला ।।
शिवतेज ठासून भरू,जनशोणितांत।
करू हिंदुदेश हा बलदंड उभ्या जगांत।।
अशी भावना उराशी बाळगून आज दुर्गामाता दौडीची सांगता झाली गेले नऊ दिवस शहर परिसरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने नवरात्री उत्सव निमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते.
देव, देश, धर्म, स्वधर्म आणि स्वराज्य रक्षणासाठी जागृती करण्या साठीच श्री दुर्गा माता दौड चे आयोजन करण्यात येते. यंदा बेळगावच्या दौडी चे 20वे वर्ष होते सुरवातीच्या काळात शे पाचशे तरुणांचा सहभाग आज हजोरों च्या संख्येत पोहोचला आहे. विजयादशमी च्या महूर्तावर शहरात दौडीचे आयोजन करण्यात आले मारुती मंदिर येथे शंकर दादा भातकांडे व माजी महापौर सरिता पाटील यांच्या हस्ते आरती करून ध्वज चढवण्यात आला. प्रेरणा मंत्र सांगून दौड मारुती गल्ली मार्गे नरगुंदकर भावे चौक, महालक्ष्मी मंदिर बसवणं गल्ली, देशपांडे गल्ली,बसवाणा मंदिर, अशोक चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, कोनवाळ गल्ली, अनसुरकर गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, केळकर बाग, समदेवी गल्ली,संयुक्त महाराष्ट्र चौक, नार्वेकर गल्ली,शनिवारकूट, काकती वेस रोड, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कांग्राळ गल्ली, काली आमराई, गोंधळी गल्ली मार्गे दौड धर्मवीर संभाजी चौक येथे दौड पोहोचली.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे मिरज चे धारकरी श्री प्रसाद कुलकर्णी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते शिवाजी महाराजांच्या चरित्र व सुवर्ण सिंहासन वर त्यांनी मार्गदर्शन केले.
शिवाजी महाराज हे आपल्या जीवन काळात स्वराज रक्षणासाठी दौड करीत होते हीच प्रेरणा घेऊन आदरणीय संभाजी भिडे गुरुजी यांनी दुर्गामाता दौड सुरू केली आजच्या तरुणांना याची जाणीव करून देण्यासाठी दूरच माता दौडी चे आयोजन करण्यात येते असे त्यांनी संबोधन केलं.
शिवाजी महाराजांनी मावळच्या दऱ्या खोऱ्यातून लोकांना सोबत घेऊन परकीय सते विरोधात झुंज दिली, व्हिएतनाम सारख्या छोट्या देशांनी सुद्धा शिवाजी महाराजांची युद्ध नीती वापरून अमेरिका सारख्या बलाढ्य देशाला झुंजत ठेवले. फक्त शिवाजी महाराजांचा बेंचीच्या डेटा पासून घोषणा देऊन चालणार नाही त्यांचे गुण रक्तात बिंबवले पाहिजे असे ते म्हणाले.
किल्ले श्री रायगड येथे पुनरप्रस्थापित होणारं सुवर्ण सिंहासन मुळे देशाला महासत्ता बनवण्या साठी मदत होणार आहे त्या साठी प्रत्येकाचे हे कर्तव्य समजून निधी अर्पण केला पाहिजे असे त्यांनी आवाहन त्यांनी केले. व्यासपीठ वर उद्योजक शिरीष गोगटे, माजी महापौर सरिता पाटील, संज्योत बांदेकर, जिल्हा प्रमुख किरण गावडे, शहर प्रमुख अजित जाधव, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील उपस्थित होते.
एशियन पॅसिफिक मास्टर गेम्स मध्ये 5 सुवर्ण व 1 कांस्य पदक मिळवलेल्या शीतल दिनेश कोल्हापूरे हीचा सन्मान करण्यात आला.
नरवीर ढोल ताशा पथक 111111
वज्रनाद ढोल ताशा पतक 25000
रमाकांत कोंडुस्कर 25000
माजी महापौर सरिता पाटील 11000
माजी महापौर संजोत बांदेकर 11111
चेतन जुटेकर 3200
सुनीता विनायक बेळगावकार 5001
मधुकर लक्ष्मण बिरजे 1111
शिवाजी रमेश यल्लप्पा मुतगेकर 2000
विनायक संजय शिंदे 1111
सागर पवार 7777
सुभाष बकेर्स 2501
वैजनाथ किल्लेकर 1000
राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळ संयुक्त महाराष्ट्र चौक 11111
विजय कुंटे 2500
चव्हाण डेअरी 2100
सतीश मुतगेकर 501 यांनी सुवर्ण सिंहासन साठी कर्तव्यनिधी सुपूर्द केला.
उद्योजक शिरीष गोगटे, माजी महापौर सरिता पाटील, संज्योत बांदेकर यांच्या हस्ते ध्वज उतरवून दौडीची सांगता करण्यात आली.जानेवारी २०१९ मध्ये होणारी गडकोट मोहीम किल्ले श्री प्रतापगड ते किल्ले श्री रसाळगड असेल असे संभाजीराव भिडे गुरुजी यांनी सांगली येथे जाहीर केले.