आजच्या कॅम्प व शहराच्या मध्यवर्ती भागात दौडी ला उदंड प्रतिसाद लाभला हजारोंच्या संख्येने दौडीत सहभागी होऊन युवा वर्गाने दौड यशस्वी केली. प्रामुख्याने कॅम्प भागात निघालेली दौड सर्वांचे मन जिंजून घेतली .सर्व धर्मीयांकडून होणाऱ्या स्वागत मुळे दौडी ला अजून महत्व प्राप्त झाले दौडी मध्ये पारंपारीक वेषभूषा करून सहभागी झालेला युवा वर्ग लक्षवेधी ठरला होता.
प्रारंभी शिवतीर्थ मिलीट्री महादेव येथून मराठा लाईट इन्फन्ट्री चे कर्नल बी एस घेवरी मेजर जनरल उत्तम शिंदे यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्ती चे पूजन करून दौडीस प्रारंभ करण्यात आला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित दुर्गा माता दौड च्या जागराने अवघ्या शहर परिसतात चैतन्यादायी वातावरण निर्माण झाले आहे .छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयघोषाने बेळगावकारांची पहाट सुरू होत आहे.
कॅम्प व शहराच्या मध्यवर्ती भागात प्रमुख गल्ली व मार्गावरून निघालेल्या या दौडीत शिवरायांचा अखंड गजराने परिसर दुमडून गेला होता . ठिकठिकाणी सुवासिनींनी आरती ओवाळून परम पवित्र भगव्या ध्वजाचे पूजन केले.
संयुक्त महाराष्ट्र चौक येथे मारुती मंदिरात दौडीची सांगता करण्यात आली या वेळी क्राईम आणि ट्रॅफिक चे डी एस पी नंदगावी चाटर्ड अकौंटंट शिवानंद शहापुरकर, सुधीर गाडगीळ उपस्थित होते.
श्री कालिका देवी युवक मंडळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बापट गल्ली यांच्या कडून ₹ 51000, महिला आघाडी च्या रेणू किल्लेकर यांच्या कडून ₹11111,शिवानंद शहापुरकर यांच्या कडून ₹11111तर सुधीर गाडगीळ यांच्या कडून ₹ 5001 चा धनादेश श्री शिवप्रतिष्ठान च्या प्रमुखांकडे सुपूर्द केला.
उद्या ची दौड
श्री दुर्गा माता मंदिर बसवेश्वर चौक ते श्री मंगाई देवी मंदिर वडगांव.